बिटकोत रुग्ण, नातेवाइकांना मोफत भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:56+5:302021-05-09T04:14:56+5:30
दररोज मागणीनुसार रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण दिले जाणार आहे. शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. रुग्णालयात नाशिक, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर दिंडोरी, ...
दररोज मागणीनुसार रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण दिले जाणार आहे. शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. रुग्णालयात नाशिक, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर दिंडोरी, सुरगाणा आदी तालुक्यांतील रुग्ण उपचार घेत आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलकडून जेवण दिले जाते. मात्र, नातेवाइकांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी जी फाउंडेशन व शिवसेनेने यांनी मोफत जेवणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी नोडल अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर, दीपक लवटे आदी उपस्थित होते. शिवसेनेचे उत्तम कोठुळे, राजेश फोकणे, नितीन चिडे, गणेश बनकर, मिलिंद माळवे, सुनील सोनवणे, तसेच अतुल धोंगडे, कैलास मालुंजकर, शेखर बनकर, समाधान शहाणे, तुषार पाटील, संकेत भोसले आदी उपस्थित होते. (फोटो ०८ शिवसेना)