बिटकोत लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:57+5:302021-08-26T04:17:57+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर ते तपासणीसाठी मुंबई अथवा पुण्याला पाठवावे लागत होते. त्याचा अहवाल चार ते पाच ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर ते तपासणीसाठी मुंबई अथवा पुण्याला पाठवावे लागत होते. त्याचा अहवाल चार ते पाच दिवसांनी किंवा कधीकधी आठवड्यांनी येत होता. त्यामुळे उपचार करताना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता बिटको कोरोना सेंटरमध्ये एप्रिल महिन्यापासून लॅब सुरू करण्यात आल्याने १८ ते २४ तासांत नमुन्यांचा अहवाल मिळत असल्याने लागलीच उपचार करता येत आहे. त्यामुळे रुग्ण बरे व्हायची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टेकर, वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. आवेश पलोड, मनपा विभागीय अधिकारी संजय गोसावी, कोरोना सेंटर प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. रत्नाकर पगारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. स्वाती भावसार यांनी लॅबच्या कामाची माहिती दिली.