पिसाळलेल्या श्वानाचा जनावरांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:18 AM2019-09-02T00:18:36+5:302019-09-02T00:21:30+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण शिवारातील शेतकऱ्यांच्या जनावरांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे यात काही जनावरांना गंभीर इजा झाली असून, पिसाळलेल्या श्वानाच्या भीतीने गाव व शिवार परिसरातील शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, जखमी जनावरांवर नवी बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. आहेर यांनी उपचार केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण शिवारातील शेतकऱ्यांच्या जनावरांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे यात काही जनावरांना गंभीर इजा झाली असून, पिसाळलेल्या श्वानाच्या भीतीने गाव व शिवार परिसरातील शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, जखमी जनावरांवर नवी बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. आहेर यांनी उपचार केले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून भादवण गावाजवळील राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील गिरणा पुलावर अज्ञात शेतकºयाने पिसाळलेला श्वान चावल्याने मृत झालेले पशुधन पुलाच्या रस्त्याच्या मोकळ्या परिसरात टाकल्याने या परिसरातील भटक्या श्वानांनी या मृत जनावराचे मास खाल्ल्याने परिसरातील भटके श्वानही पिसाळले असल्याचे शेतकरी बांधवांकडून यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात येथील शेतकरी बांधवांनी व भादवण येथील मनसेचे तालुका उपाध्यक्ष गौतम जाधव यांनी दि. ३१ रोजी कळवण पोलिसात निवेदन देऊन तक्रार केली होती व पोलिसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले होते व रविवारी दुपारी चार वाजता शिवारातील भटके श्वान पिसाळल्याने या श्वानाने भादवण येथील पोलीसपाटील कैलास जाधव यांच्या बैलजोडीला चावा घेतला असून, रोशन जाधव यांची दुभती म्हैस, योगेश जाधव यांच्या शेळ्यांनाही चावा घेत गंभीर जखमी केले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले.
पिसाळलेल्या श्वानाने शेतकºयांच्या शेळ्या, गाय, पारडू, बैल यांना चावा घेतल्याने शेतकरी व पशुपालकांचे नुकसान झाले आहे. भादवण गाव व परिसरात पाळीव श्वानांची संख्या कमी असून गाव व शिवारात मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ होत असून, पावसाळ्यात गाव परिसरातील मोकाट श्वानही पिसाळल्याने पशुपालक व गावकºयांना जनावरे, लहान बालके, वृद्ध, शाळकरी मुले व मोटारसायकलस्वार यांना त्याचा त्रास होत आहे.
असून शेतकर्यांच्या शेळ्या ,गाय ,पारडू ,बैल या पाळीव जनावरांना पिसाळलेली कुत्रे चावल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे . श्वानांच्या बंदोबस्ताची मागणीलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिक व दोन लहान मुलांना चावा घेऊन जखमी केले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना गड उतरण्यासाठी ट्रस्टने स्वतंत्र पायºयांची व्यवस्था केली आहे. गडावरील एका रहिवाशाने पाळलेले श्वान पिसाळले म्हणून ट्रस्टच्या वेटिंग हॉलमध्ये मोकाट सोडून दिले. ते भाविकांच्या अंगावर धावून जात आहे. त्याने अनेकांना चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामपंचायतीने व ट्रस्टने या पिसाळलेल्या श्वानाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच संबंधित श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थांनी केली आहे.