कडवा धरण ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:25 PM2020-08-22T17:25:33+5:302020-08-22T17:26:23+5:30
सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन त्यामुळे सकाळी तालुक्यातील ८५.७० दशलक्ष घनमीटर क्षमतेचे कडवा धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे भविष्यात लाभ क्षेत्रातील सिन्नर व इतर खालच्या भागातुन जाणा-या ८८ किमी च्या कडवा कालव्यातुन सोडलेल्या पाण्याच्या माध्यमातून एकूण सुमारे १९ हजार ४०४ हेक्टर शेती क्षेत्र ओलिता खाली येणार असुन त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्र्गी लागला आहे.

कडवा धरण शंभर टक्के भरल्याचे औचित्य साधुन परिसरातील निनावीचे सरपंच गणेश टोचे, पिंपळगाव घाडगा सरपंच देविदास देवगिरे, पिंपळगाव डुकराचे सरपंच भगवान वाकचौरे,मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे,गुरु हनुमान आखाड़ा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम त्याच प्रमाणे दारणा पाठोपाठ चौथे कडवा धरणही भरले आहे. आता मुकणे व वाकी-खापरी ही दोन्ही धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे. तालुक्यात आजपर्यंत जवळपास पावने तीन हजार मिमी पाऊस पडला आहे. मुकणे धरणात जवळपास ६५ टक्के पाणी उपलब्ध झालेले आहे. सांजेगाव पर्यंत पाणी टेकायला गेले आहे. तर वाकी-खापरित देखील आज ५५ टक्के पाणी आल्याची माहिती नाशिक जलसंपदा विभागाने दिली. पावसाच्या माहेरघरावर दरवर्षी प्रमाणे आभाळमाया झाल्यामुळे तालुक्यातील चार धरणे भरली असुन उर्वरित दोन्ही धरणे लवकरच भरतील असा अंदाज आहे. तसेच खेड,वाडीव-हे व इतर छोटे मोठे लघु पाटबंधारे प्रकल्प दुथडी भरून वाहत आहेत. डवा धरणावर जलपूजन करते वेळी कड़वाचे निरीक्षक माळी, शिपाई जुंद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते. कडवा धरण भरल्यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी समाधानी आहेत.
सुरुवातीला पावसाने दीड़ महिना ओढ़ दिली होती. त्यामुळे पावसाच्या माहेरघरावर कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिति निर्माण झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांत च पावसाने सुमारे दोन हजार मिमी बरसुन सरासरी कड़े जोरात वाटचाल केली आहे. मंगळवारी नक्षत्र बदलले आहे तेव्हापासून पाऊस अजुन जोरात सुरु आहे. ही स्थिति यापुढे काही दिवस अशीच कायम रहिल्यास नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत मुकणे आणि वाकी-खापरी ही दोन्ही धरणे भरण्याच्या मार्गावर असतील.