बारावी परीक्षेच्या पर्यायाचा तिढा; विद्यार्थ्यांपुढे समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:34+5:302021-05-26T04:14:34+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीचे वेळापत्रक जाहीर करून २३ एप्रिल ते २९ मेदरम्यान परीक्षा ...

The bitterness of the twelfth exam option; Look at the problems in front of the students | बारावी परीक्षेच्या पर्यायाचा तिढा; विद्यार्थ्यांपुढे समस्यांचा पाढा

बारावी परीक्षेच्या पर्यायाचा तिढा; विद्यार्थ्यांपुढे समस्यांचा पाढा

Next

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीचे वेळापत्रक जाहीर करून २३ एप्रिल ते २९ मेदरम्यान परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. बोर्डाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक आणि हॉलतिकीट ३ एप्रिलपासून उपलब्ध दिलेले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेेतल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची असतेे, त्यावर त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे भवितव्य अवलंबून असते. अशावेळी त्यांचे मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा पर्याय समेार आलेला आहे. याबरोबरच त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिस्टन्स नियमांचे पालन करून परीक्षा घेणे शक्य असल्याने मुलांना परीक्षा दिल्याचेही समाधान मिळू शकणार असल्याने परीक्षेचा पर्यायच उत्तम पर्याय असल्याचे बहुतांश शिक्षण तज्ज्ञांनी मत मांडले आहे. दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारावर गुणदान करण्याचा पर्यायदेखील काही मान्यवरांनी मांडला आहे. ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा घेण्याच्या पर्यायांचा विचार करावा असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

--इन्फो--

एकूण विद्यार्थी

७५,३४३

मुली

३६,५१३

मुले

३८,८३०

--विद्यार्थी संभ्रमात--

परीक्षा घेण्याबाबत अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. वेळापत्रक पाहिले तर महिनाभर परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बदल करून विद्यार्थी पालकांना परीक्षेचा कालावधी निवडण्याची संधी दिली पाहिजे. दोन पेपर्समध्ये गॅप न ठेवता सलग परीक्षा घेतली तर पुढील महिन्यात परीक्षा घेणे शक्य होऊ शकते. इतर चर्चा करण्यापेक्षा प्रसंगावर मात करून परीक्षा घेणे कसे सुलभ होऊ शकते, याचा विचार करायला हवा. आता विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यांना दिलासा मिळावा.

-- संकेत राजभोज, विद्यार्थी

परीक्षा घेतली पाहिजे असे आमचे मत आहे. कारण त्यावरच पुढील शैक्षणिक करिअर अवलंबून आहे. आता केवळ मधला मार्ग काढला जाईल; मात्र पुढे त्याच निकालावर संधी किती मिळू शकते, हाही मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण अनेक संस्था त्यांच्या पातळीवर निकष लावत असते. परीक्षा न घेता मूल्यमापनावर निकाल दिला तर पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा घेतली पाहिजे.

- आकाश भोसले, विद्यार्थी

शासन, शिक्षण विभाग तसेच न्यायालय अशा पातळीवर सध्या बारावीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्णय होण्यापेक्षा गुंतागुंतच अधिक होण्याची शक्यता आहे. कारण आता जरी काहीही निर्णय घेतला तरी पुन्हा न्यायालय आणि पुन्हा पडताळणी, समिती असे चक्र सुरूच राहील. ऑनलाईन परीक्षा घेऊन लागलीच निकाल देण्याचीदेखील पद्धत आहे. त्यामुळे अशा पर्ययाचा विचार करावा तरच मार्ग निघू शकेल.

-- विप्लव सायखेडकर विद्यार्थी

Web Title: The bitterness of the twelfth exam option; Look at the problems in front of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.