भाजपाचा वर्धापनदिन

By admin | Published: April 7, 2017 02:15 AM2017-04-07T02:15:50+5:302017-04-07T02:16:05+5:30

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाचा स्थापनादिन महानगरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.

BJP anniversary | भाजपाचा वर्धापनदिन

भाजपाचा वर्धापनदिन

Next

 नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाचा स्थापनादिन महानगरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास विजय साने, सतीश शुक्ल, देवदत्त जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
प्रारंभी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, शैलेश जुन्नरे, अरु ण शेंदुर्णीकर, सतीश शुक्ल यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्य साने यांनी प्रतिज्ञावाचन केले. एकात्ममानव वादाच्या आधारे सर्वांना समानतेची वागणूक देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहेत. पक्षाचे संघटन घरोघरी पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन विजय साने यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी डॉ. प्रशांत पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू, राजेंद्र कोरडे, उदय रत्नपारखी, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. बसंतीलाल गुजराती, भारती बागुल, पुष्पा शर्मा, सुजाता करजगीकर, हिमगौरी आडके, धनंजय पुरोहित, बाळासाहेब पाटील, स्नेहा खांदवे, संदीप खांदवे, संपत जाधव, वसंत उशीर, प्रा.सुनील बच्छाव, विजय गायखे, ललिता बिरारी, वर्षा डांगरीकर, वैशाली शहा आदि उपस्थित होते.
तसेच इंदिरानगर येथेही पक्षाचा स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, यावेळी सुनील देसाई, सुहास लेंभे, राजश्री शौचे, मंगेश नागरे, तुषार जोशी, उदय जोशी, अवधूत कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमित चव्हाण, सखाराम परब, निषाद जोशी, दिलीप येलमामे. मीनानाथ फासे आदि उपस्थित होते. प्रभाग क्र . १६ आणि प्रभाग क्र . १४ मध्येही स्थापनादिनाचा कार्यक्र म झाला.
यावेळी द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुरेश मानकर, कैलास वैशंपायन, अनिल ताजनपुरे, रवि भालेराव आदि उपस्थित होते. डी.जी.पी.नगर येथे नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.

Web Title: BJP anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.