नमो उद्यानावरून भाजपात वाद ;सीमा हिरे यांच्यावर शहाणे यांची टीका : भाजपा नगरसेवकाचे आमदारास आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:26 AM2017-12-04T00:26:20+5:302017-12-04T00:29:26+5:30
सिडको : महापालिका निवडणूक होण्याआधीपासून तसेच निवडणुकीच्या वचननाम्यातदेखील पेलिकन पार्कचा मुद्दा घेण्यात आला असून, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा याबाबत निवेदनही दिले आहे. असे असताना स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी नुसता पत्रव्यवहार करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य व भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सिडको : महापालिका निवडणूक होण्याआधीपासून तसेच निवडणुकीच्या वचननाम्यातदेखील पेलिकन पार्कचा मुद्दा घेण्यात आला असून, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा याबाबत निवेदनही दिले आहे. असे असताना स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी नुसता पत्रव्यवहार करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य व भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुळात हा विषय महापालिकेच्या अखत्यारितील असून, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने यात महापालिकेच्या निधीबरोबरच शासनाकडूनदेखील निधीची मदत लागणार असला तरी हा विषय मनपाशी संबंधित असल्याचे सांगत यापुढील काळात हा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही शहाणे यांनी यावेळी सांगितले.
सिडकोच्या मध्यवस्तीत असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राजकीय पुढाºयांकडून पाठपुरावा सुरूअसून, गेल्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीच्या काळातही हा मुद्दा कायम उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न कायमचा निकाली लागावा यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करीत असल्याचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीदेखील भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदनही देण्यात आले असल्याचेही शहाणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनां दिलेल्या निवेदनात म्हटले की सिडको भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी भाग असून, सिडकोच्या मधोमध १७ एकर जागेत पेलिकन पार्क उभारण्यात आले असून, सदर उद्यान बी.ओ.टी.तत्त्वावर खासगी कंपनीस देण्यात येऊन याठिकाणी मनोरंजनाचे साहित्य उभारण्यात आले होते. परंतु काही महिन्यातच हे पार्क बंद पडले व याठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा निर्माण झाला असून, याठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा वावर होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
प्रभागासह सिडको भागातील ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध, लहान मुले यांना मनोरंजनासाठी एकही जागा नसल्याने याचा विकास व्हावा याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.
तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावादेखील सुरू असताना स्थानिक आमदार सीमा हिरे या नगरसेवकांना विश्वासात न घेता याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही मुकेश शहाणे यांनी पत्रकर परिषदेत सांगितले.नगरसेवकांमध्ये नाराजी
पेलिकन पार्कबाबत महापालिके च्या बाजूने निकाल लागल्याने याठिकाणी काम करण्यास हरकत नसल्याचे विधी समितीच्या वतीने सांगण्यात आले. विशेष म्हणजे नगरसेवकांनी कामे सुचविण्यापूर्वीच याठिकाणी ‘नमो उद्यान’ साकारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आल्याचे सांगितल्याने नगरसेवकांमध्येदेखील नाराजी व्यक्त केली जात आहे. या जागेवर नमो उद्यान साकारण्याचा प्रस्ताव आमदार सीमा हिरे यांनी दिला असून, त्यानुसार दहा कोटी रुपये खर्च करून उद्यानाचे काम केले जाणार आहे.
नागरिकांना विकासाची अपेक्षा
मुकेश शहाणे हे भाजपाचे नगरसेवक असून स्थानिक आमदार सीमा हिरे यादेखील भाजपाच्याच असताना हा श्रेयवाद का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, वाद-विवाद अथवा श्रेयवाद बाजूला ठेवत विकास करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.