सटाण्यात भाजपने रोखला शिर्डी-सटाणा महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:42+5:302021-06-27T04:10:42+5:30
शनिवारी सकाळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोरेनगर चौफुलीवर ओबीसी आणि मराठा ...
शनिवारी सकाळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोरेनगर चौफुलीवर ओबीसी आणि मराठा आरक्षण घालवणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत शिर्डी-साक्री महामार्गावर ठिय्या देण्यात आला. यावेळी एक तास वाहतूक रोखून धरण्यात आली. आंदोलनात भाजपचे चिटणीस संदीप खैरणार, सरपंच योगेश भदाणे, भरत अहिरे, जयवंत पवार, अरुणा देवरे, मनोज अहिरे, केदा देवरे, शेतकरी संघटनेचे सुधाकर पाटील, मोठाभाऊ सोनवणे, दादाजी सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, महादू पवार, हेमंत चंद्रात्रे ,सुरेश अहिरे, भरत बिरारी, महेश भदाणे, कैलास वाघ, बाळासाहेब देवरे, दत्तात्रेय वाघ आदी सहभागी झाले होते.
इन्फो
...तरच पुन्हा आरक्षण मिळेल!
आमदार बोरसे यांनी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एक आयोग नेमून त्याद्वारे ओबीसींचे लोकसंख्येतील प्रमाण निश्चित करण्यासाठी डेटा मिळविणे आवश्यक आहे. तसे केले तरच हे आरक्षण पुन्हा मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
फोटो : २६ सटाणा बीजेपी
सटाणा शहरातील मोरेनगर चौफुलीवर भाजपाच्यावतीने आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी बिंदूशेठ शर्मा, संदीप खैरणार, सुधाकर पाटील, अरुणा देवरे, भरत अहिरे, जयवंत पवार आदी.
===Photopath===
260621\26nsk_32_26062021_13.jpg
===Caption===
फोटो : २६ सटाणा बीजेपी सटाणा शहरातील मोरेनगर चौफुलीवर भाजपाच्यावतीने आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी बिंदुशेठ शर्मा, संदीप खैरणार, सुधाकर पाटील ,सौ . अरुणा देवरे ,भरत अहिरे ,जयवंत पवार आदी.