भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडणुकींना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:54 AM2019-12-29T00:54:28+5:302019-12-29T00:54:46+5:30

विधानसभा निवडणूका संपताच भाजपने संघटनात्मक निवडणूका जाहीर केल्या होत्या. १० डिसेंबरपर्यंत राज्यात सर्व संघटनात्मक निवडणुका घेण्याचे जाहिर करण्यात आले होते.

 BJP board presidential elections finally start | भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडणुकींना अखेर प्रारंभ

भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडणुकींना अखेर प्रारंभ

Next

नाशिक : विधानसभा निवडणूका संपताच भाजपने संघटनात्मक निवडणूका जाहीर केल्या होत्या. १० डिसेंबरपर्यंत राज्यात सर्व संघटनात्मक निवडणुका घेण्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र, संघटनात्मक निवडणुकांमधील अडचणींमुळे वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. नाशिकमध्ये बुथप्रमुख आणि मंडल अध्यक्षांची निवडणूक रखडल्याने शहराध्यक्षपदाची निवडणूक रखडली होती. मात्र, त्यानंतर पक्षाने जळगाव येथे झालेल्या पक्ष बैठकीनंतर मंडलाची पुनर्रचना केली असून, आता एकूण दहा मंडल तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार पश्चिम नाशिक मतदारसंघात पूर्वी सिडको आणि सातपूर अशी दोनच मंडले होते. त्याठिकाणी सिडको एक, सिडको दोन आणि सातपूर असे तीन मंडल तयार करण्यात आले असून, मध्य नाशिक मतदारसंघात मध्य आणि द्वारका असे दोन मंडल होते. त्यात आता द्वारका, जुने नाशिक तसेच मध्य मंडल असे तीन मंडल करण्यात आले आहेत, तर पूर्व नाशिकमध्ये पंचवटी एकच मंडल होते त्याला आता पंचवटी, तपोवन आणि नाशिकरोड असे तीन मंडल करण्यात आले आहेत. याशिवाय नाशिकरोड आणि देवळाली या दोन मंडलदेखील शहरात समावून घेण्यात आले आहेत.
या पुनर्रचनेनंतर शनिवारपासून मंडल अध्यक्षांच्या निवडीला प्रारंभ झाला आहे. निवडणूक अधिकारी रामहरी संभेराव, शरद मोरे आणि सहायक निवडणूक अधिकारी सुजाता करजगीकर, भारती बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत द्वारका, जुने नाशिक व मध्य मंडलांमध्ये अध्यक्षपदी सुनील देसाई, भास्कर घोडेकर व देवदत्त जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.
यानंतर उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते विजय साने, सतीश बापू सोनवणे आदी उपस्थित होते.
इच्छुकांच्या हालचाली गतिमान
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकींना प्रारंभ झाल्याने शहर जिल्हाध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याबरोबरच अध्यक्षपदासाठी सुनील केदार, उत्तमराव उगले, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, अशिश नहार, अनिल भालेराव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने तरूण आणि नव्या चेहेºयावर भर दिल्याने प्रस्थापित नेते मात्र स्पर्धेतून बाद झाले आहेत.
तीन जानेवारीला निवड होणार
गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकींना अखेर प्रारंभ झाला असून, शनिवारी (दि.२८) तीन मंडलाच्या निवडणुकांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले. यात द्वारका, जुने नाशिक व मध्य मंडलांमध्ये अध्यक्षपदी सुनील देसाई, भास्कर घोडेकर व देवदत्त जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नऊ मंडलांच्या निवडणुका पार पाडण्यात येणार असून, ३ जानेवारीच्या आत नूतन शहराध्यक्षांची निवड होणार आहे.

Web Title:  BJP board presidential elections finally start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.