पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या नागरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:47 AM2019-06-04T01:47:43+5:302019-06-04T01:48:04+5:30
येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि. ३) शिक्कामोर्तब केले आहे. सदरची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपाने राष्टवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना साकडे घातले. तथापि, पक्षच याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
सातपूर : येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि. ३) शिक्कामोर्तब केले आहे. सदरची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपाने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना साकडे घातले. तथापि, पक्षच याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्र मांक दहामधील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रि या सुरू झाली आहे. ३० मेपासून ते ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळी भाजपा मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या निवासस्थानी संघटक किशोर काळकर, महापौर
रंजना भानसी, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रशांत जाधव, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, रवींद्र धिवरे, रोहिणी नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभागाचा आढावा घेण्यात आला आणि भाजपाची उमेदवारी दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. या बैठकीस विक्र म नागरे, रामहरी संभेराव, राजेश दराडे, संजय राऊत, दिनकर कांडेकर, गणेश बोलकर, मंगल खोटरे, स्मिता जोशी, पवन भगूरकर, निवृत्ती इंगोले, राजेंद्र चिखले आदींसह मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाने पोटनिवडणुकीची जबाबदारी मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्यावर सोपविली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यासह तिन्ही आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
तेव्हा भाजपाने ऐकले नव्हते त्याचे काय?
भाजपाने प्रस्ताव सादर केल्यानंतर मनसेच्या (कै.) सुरेखा भोसले यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार असताना भाजपाने सहकार्य केले नव्हते त्याचे स्मरण करून दिले. त्यावेळी विरोधी पक्षांनी बिनविरोध निवडणुकीसाठी अॅड. वैशाली भोसले यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नका, अशी विनंती करूनही भाजपा आणि शिवसेनेने उमेदवार दिले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करणाºया भाजपाला त्याचेदेखील विरोधकांनी स्मरण करून दिले आहे.