सहलीवर गेलेल्या भाजप नगरसेविकेचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:54 AM2022-02-14T01:54:53+5:302022-02-14T01:55:17+5:30

येत्या मंगळवारी (दि.१५) सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेवक काशीबाई नागू पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना गुजरातमधील वापी येथे रविवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

BJP corporator dies | सहलीवर गेलेल्या भाजप नगरसेविकेचे निधन

सहलीवर गेलेल्या भाजप नगरसेविकेचे निधन

Next
ठळक मुद्देसुरगाणा नगरपंचायत : नगराध्यक्ष निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

नाशिक : येत्या मंगळवारी (दि.१५) सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेवक काशीबाई नागू पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना गुजरातमधील वापी येथे रविवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत येथील ७० वर्षीय काशीबाई पवार या भाजपकडून प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आल्या होत्या. त्यांची सून अमृता पवार यादेखील प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आल्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक असल्याने भाजपचे नगरसेवक व महिला नगरसेवक सहलीवर गेले आहेत. काही नगरसेवक वापी येथे, तर पवार परिवारातील सदस्य अजमेर येथे गेले होते. अजमेर येथे दर्शन घेऊन ते वापी येथे रात्री उशिरा पोहोचले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या काशीबाई यांना स्नानगृहातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 

इन्फो

आयोगाकडे मार्गदर्शन मागवले

१५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजप ८, शिवसेना ६, माकप २ व राष्ट्रवादी काँग्रेस १ याप्रमाणे पक्षीय बलाबल असून, नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून विजय कानडे व शिवसेनेकडून भारत वाघमारे यांनी नामांकनपत्र दाखल केले आहे. हे पद मिळविण्यासाठी दोन्हीकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथमच निवडणूक लढवत विजय प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेवक काशीबाई पवार यांचे निधन झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीबाबत प्रशासनाने आयोगाकडून मार्गदर्शन मागवले आहे.

 

Web Title: BJP corporator dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.