भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांना अटक

By Admin | Published: May 27, 2017 12:44 AM2017-05-27T00:44:13+5:302017-05-27T00:44:24+5:30

नाशिक : पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित व बेपत्ता असलेला जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़

BJP corporator Hemant Shetty arrested | भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांना अटक

भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित व १ आॅक्टोबर २०१५ पासून बेपत्ता असलेला पंचवटीतील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनाचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे़ बेपत्ता ज्वाल्या हा ज्या दोघा संशयितांबरोबर अखेरचा दिसला होता त्यांना अटक करून त्यांची पोलीस स्टाइलने चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला़ ज्वाल्याच्या खुनात पोलिसांनी भाजपा नगरसेवक हेमंत (अण्णा) शेट्टी यांच्यासह सहा संशयितांवर शुक्रवारी (दि़ २६) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये पंचवटीतील वाघ खुनासह विविध गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांचा समावेश असून, खून करून पुरावे नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे़
१ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जालिंदर उगलमुगले हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती़ या तपासात ज्वाल्याचा घातपात झाल्याचे तसेच त्यास अखेरचे संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांच्यासोबत बघितल्याचे समोर आले़ यावरून कौलकर व कडाळे या दोघांना अटक करून पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ज्वाल्याला वाघाडी येथे नेऊन दारू पाजून टाकळी परिसरात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले़ कौलकर व कडाळे यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी या गुन्ह्यात श्याम महाजन यास अटक करून सखोल तपास केला असता त्याने अपहृत ज्वाल्याचा परदेशी व कोष्टी यांच्या मदतीने खून करून इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे या शिवारात नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली दिली़
याबाबत घोटी पोलिसांकडे तपास केला असता तेथे अकस्मात मृत्यूची नोंद आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी परदेशी व कोष्टी यांच्यावर खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान हे दोघे कारागृहात असून, त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ, विजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, पोलीस हवालदार कोकाटे, भास्कर गवळी, सुरेश नरवडे, सचिन म्हसदे, महेश साळुंखे, प्रभाकर पवार, संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, भूषण रायते, संदीप शेळके, संतोष काकड, उत्तम खरपडे, मुक्तार शेख यांनी ही कामगिरी केली़

Web Title: BJP corporator Hemant Shetty arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.