शहर बससेवेसाठी भाजप नगरसेविकेचे परिवहनमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:01+5:302021-02-11T04:16:01+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी नाशिक महानगरपालिकेने परिवहन बस वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने वाहतूक परवाना द्यावा, असे साकडे ...
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी नाशिक महानगरपालिकेने परिवहन बस वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने वाहतूक परवाना द्यावा, असे साकडे भाजपच्या नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांना घातले आहे.
परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाने नाशिक मनपास शहर बससेवा चालविण्यासाठी असमर्थता दर्शवून मनपानेच शहर बससेवा चालवावी, अशी वारंवार सूचना केली होती. शहरातील अनेक बसचे मार्ग बंद केले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळेच महापालिकेला ही सेवा सुरू करावी लागत आहे. महापालिकेची तयारी पूर्ण झाली असली, तरी राज्य सरकारकडून परवानगी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिवहन परवाना द्यावा, अशी मागणी नगरसेविका प्रा.डॉ. वर्षा भालेराव यांनी केली आहे.