करवसुली न करण्याची भाजयुमोची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:36 PM2021-06-16T23:36:38+5:302021-06-17T00:56:14+5:30

त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत.

BJP demands non-collection of taxes | करवसुली न करण्याची भाजयुमोची मागणी

करवसुली न करण्याची भाजयुमोची मागणी

Next
ठळक मुद्देपालिकेने नोटिसा बजावून व्याज व दंडासह वसुली केली होती.

त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने एकत्रित करवसुली, पाणीपट्टी व पालिका गाळेभाडे वसुली यावर्षी करु नये, अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव यांना देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष समीर पाटणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्यासह युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज मुळे, संकेत टोके, जयदीप शिखरे, ओंकार कचोळे, निलेश पवार, सागर सोनार, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मागच्या वर्षी देखील नगरसेवकांनी एकमताने लॉकडाऊनमध्ये दलित आदिवासी हातावर पोट भरणारे व्यावसायिक यांच्याकडून पालिकेने कर वसूल करु नये, असा प्रस्ताव दिला होता. तरीही जानेवारीपासूनच पालिकेने नोटिसा बजावून व्याज व दंडासह वसुली केली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
 

Web Title: BJP demands non-collection of taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.