पाकीस्तानचा झेंडा जाळून सिन्नरला भाजपाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 05:43 PM2019-02-15T17:43:15+5:302019-02-15T17:43:31+5:30
सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकीस्तानचे झेंडे जाळण्यासह पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाकीस्तानचा निषेध केला.
येतील शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी पदाधिकाºयांनी पाकीस्तानच्या या भ्याड कृत्याचा निषेध केला. भारत सरकार पाकीस्तानला जशास तसे उत्तर देवून जवानांच्या बलीदानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाकीस्तानी ध्वज जाळत पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हल्ल्याचा जोरदार निषेधही केला.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, राजेश कपूर, पांडुरंग पाटोळे, सुभाष कर्पे, रामनाथ डावरे, घनश्याम देशमुख, दिनकर कलकत्ते, महिला आघाडीच्या प्रमुख सविता कोठुरकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, कृष्णा कासार, माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, श्रीमती परदेशी, मंगला गोसावी, शोभा भारती, माजी सैनिक मधुकर सोनवणे, उत्तम खैरनार, बाळासाहेब हिरे, सोनू गिते, विश्वास गडाख, सुरेश ढवळे, दत्तू काळे, किशोर देशमुख, सोनल लहामगे, सागर मुत्रक, किरण पेटकर, मंगेश परदेशी, मोहन परदेशी, भूषण गायकवाड, बाबा माळी, राकेश धनगर, दत्ता वायचळे, अमोल चव्हाण, संतोष शिंदे, सोमनाथ भिसे, प्रा. राजाराम मुंगसे आदी उपस्थित होते.