नाशिकला स्मार्ट करण्यात भाजप अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:31+5:302021-01-03T04:16:31+5:30
सिडको विभागातील प्रभाग क्र. २५,२७, २८ व ३१ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्री ...
सिडको विभागातील प्रभाग क्र. २५,२७, २८ व ३१ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विकासासाठी अनेक कामे केलीत. या कामांच्या बळावर महानगरपालिकेत सत्ता आणण्याची जबाबदारी सामूहिक असल्याने सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलावा. विरोधक आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी काय षड्यंत्र करतील याचा नेम नाही. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये आपापसात चढाओढ लागली असल्याने ते एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त राहिले व त्यामुळे दत्तक घेतलेल्या नाशिक शहराचा विकास होऊ शकला नाही, असा आरोपही महाले यांनी केला. याप्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, कैलास बनकर, दत्ताकाका पाटील, मनोहर बोराडे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, राजेश भोसले उपस्थित होते.
यावेळी सिडको विभागात उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमुळे अनेकांचा बळी गेला असून, या वीजवाहिन्या भूमिगत कराव्यात, गावठाण परिसरातील स्मशानभूमी दुरवस्था, उघड्या गटारी बंदिस्त करणे, महापालिका शाळेतील संरक्षक भिंतीची दुरवस्था, रस्ते खोदकाम झाल्यावर ते पूर्ववत न करणे, सांडपाणी घरात जाणे, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्त न करणे यासारख्या समस्या नागरिकांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे समोर मांडल्या. यावेळी दादा कापडणीस, सुनील दातीर, प्रशांत खरात, डॉ. ज्योती पाटील, डॉ. आशालता दवळीकर, पुष्पा राठोड, मुकेश शेवाळे, राहुल कमानकर, सुयश मेने, चतुर्थी कदम, ऐश्वर्या गायकवाड, हर्षल चव्हाण, निलेश सानप, सुनील घुगे, जानू नवले, सम्राट गायकवाड आदी उपस्थित होते.