देवळाली कॅन्टोन्मेंटवर भाजपाचा झेंडा
By admin | Published: January 13, 2015 12:27 AM2015-01-13T00:27:12+5:302015-01-13T00:27:27+5:30
८ पैकी ६ जागांवर विजयी; शिवसेना आणि अपक्षाला एकेक जागा
देवळाली कॅन्टोन्मेंटवर भाजपाचा झेंडा८ पैकी ६ जागांवर विजयी; शिवसेना आणि अपक्षाला एकेक जागादेवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या आठ वॉर्डाकरिता झालेल्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत सहा जागांवर विजय मिळवला आहे, तर शिवसेना व अपक्ष यांना एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
देवळाली छावणी परिषद पंचवार्षिक निवडणूक यंदा प्रथमच पक्षीय चिन्हावर लढविली गेली होती. शिवसेनेने स्वतंत्र व भाजपा-रिपाइं युतीने पॅनल निर्मिती केली होती, तर इतर पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. आठ जागांसाठी तब्बल ७२ उमेदवार रिंगणात होते. ८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानामध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाले होते.
भगूर बसस्थानकासमोरील नूतन विद्यामंदिर येथे आज सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १ चा निकाल घोषित होऊन भाजपा-रिपाइं युतीने खाते उघडले. वॉर्ड क्रमांक १ मध्ये रिपाइं-भाजपा युतीचे प्रभावती धिवरे- ८२७ मते मिळवुन विजयी झाल्या. तर अपक्ष शोभा पवार- ७६२, शिवसेनेच्या उषा आडके - ५६५, आशा दास- ५६०, रेखा भालेकर- १८३, रेखा चांदणे- ४९, शीतल थामेत- ३८, दीक्षा मोरे- ४०, चंद्रप्रभा केदारे - १८, आशा मोहिते - ३२, संगीता पवार - १५, अंजू थामेत- १० मते मिळाली.