भाजपा सरकार शेतकरी विरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:46 AM2018-11-02T00:46:42+5:302018-11-02T00:46:59+5:30
नांदूरशिंगोटे : सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ यावर्षी आहे; परंतु शासनाने विविध निकष लावल्याने राज्यातील अनेक गावे दुष्काळी जाहीर होण्यापासून पासून वंचित राहिली आहेत. गेली चार वर्षे भाजपा शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून मोदी सरकारच्या काळात एकही ठोस काम झालेले नाही. केंद्राप्रमाणेच राज्यातही दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने हे शासन शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
नांदूरशिंगोटे : सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ यावर्षी आहे; परंतु शासनाने विविध निकष लावल्याने राज्यातील अनेक गावे दुष्काळी जाहीर होण्यापासून पासून वंचित राहिली आहेत. गेली चार वर्षे भाजपा शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून मोदी सरकारच्या काळात एकही ठोस काम झालेले नाही. केंद्राप्रमाणेच राज्यातही दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने हे शासन शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
येथे आयोजित शेतकरी मेळावा व पाणी परिषदेच्या कार्यक्र मात मुंडे बोलत होते. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ सुधीर तांबे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, अॅड भगीरथ शिंदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, बंडूनाना भाबड, माजी आमदार जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, भारती पवार, बाळासाहेब वाघ आदी होते.
देशात व राज्यातील परिस्थिती सर्वांना माहीत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली; परंतु चार वर्षांच्या काळात सर्वच योजना फसव्या ठरल्या असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजपाचे लोक आकडेमोड करण्यात पटाईत असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफी देताना मोठ्या प्रमाणात निकष व अटी टाकल्याने त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलने केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात एकदाही शेतकºयांना अनुदान मिळाले नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. दुष्काळसदृश तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना निकष लावल्याने वंचित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारवर यावेळी मुंडे यांनी चौफेर टीका केली. बंडूनाना भाबड यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी बंडूनाना भाबड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बंडूनाना भाबड यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नंदाताई भाबड, आत्माराम बिडगर, अरुण शेळके, राजेश भाबड, बाजीराव दराडे, विश्वास मुर्तडक, संजय खैरनार, सुनील नाईक, सुदाम बोडके, मंगेश शेळके, यतीन भाबड, समाधान गायकवाड, विश्वास भाबड, हेमंत दिघोळे आदीसह तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ भाबड यांनी केले तर आभार राजेश भाबड यांनी मानले.पाण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेराजकारणाच्या वेळेस राजकारण केले पाहिजे; मात्र विकासाच्या कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भविष्यात सर्वांना पाण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यकाळात मोदी सरकार पाण्यावरसुद्धा कर लावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.