भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:54+5:302021-03-10T04:15:54+5:30

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला ...

BJP heavy on Shiv Sena for the second time | भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

Next

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला यश येते. परंतु अखेरीस भाजप सेनेपेक्षा वरचढ ठरत सत्ता कायम ठेवत असल्याचा अनुभव दीड वर्षात दुसऱ्यांदा आला आहे. महापौरपदाच्या पाठाेपाठ यंदा स्थायी समितीत सत्ता बदल होणार असे दावे शिवसेनेने केले; परंतु प्रत्यक्षात अन्य विरोधी पक्षांना वेगवेगळ्या मार्गाने शिवसेनेपासून तोडण्यात भाजपला यश आल्याने तटस्थतेची नामुष्की पत्करण्याची वेळ भाजपावर आली आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेतील कोणत्याही पंचवार्षिक निवडणुकीत काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेने स्थायी समितीची सत्ता काबीज करण्यासाठी फासे टाकण्यास सुरुवात केली होती. भाजपाचे संख्याबळ ६६ वरून ६४ नगरसेवक असे झाल्याने स्थायी समितीत या पक्षाचा एक सदस्य पक्षीय तौालनिक संख्याबळानुसार कमी होतो तर शिवसेनेचा एक सदस्य वाढतो हा भाजपाचा गेल्या वर्षांपासून दावा होता. त्याला या वर्षी न्यायालयाने कौल दिला. परंतु पुढे त्याचा फायदा सेनेला घेता आला नाही. सेनेची सुरुवातीची आक्रमकता बघून भाजप अधिकच सावध झाली आणि सर्वांना वश करण्याचे कौशल्य असलेल्या गीते यांना सभापतीपद कबूल करून त्या दृष्टीनेच दगा फटका टाळण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते माजी महापौर व माजी सभापती यांना समितीत स्थान देऊन सभापतीपदाच्या निवडणुकीतील स्वपक्षीयांचा संभाव्य दगा फटका टाळला.

आता राहिला प्रश्न विरोधकांचा. त्यातील मनसे अगोदरपासूनच भाजपजवळ असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या फार जवळ गेले असेही नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही थडीवर काही पक्षांनी हात ठेवले आणि त्यामुळे सेनेचे गणित फिस्कटले. आताही तेच होण्याची शक्यता सेनेचे अगोदरच ओळखली आणि माघार घेऊन भाजपाला बाय देऊन टाकला. त्यामुळे राजकीय वैर असूनही भाजपला सेनेने फायदा करून दिला; परंतु दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच मनसेलाही झटका बसला. काही जणांची अवस्था तर ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशीही झाली. समोर स्पर्धकच नसल्याने

निवडणूक भाजपाला बऱ्यापैकी ‘स्वस्ता’त पार पडल्याची चर्चा आहे.

इन्फो...

महापालिका पंचवार्षिक कारकिर्दीतील हे अखेरचे वर्ष असल्याने त्यावेळी एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानावरील सत्ता जाणे हे नगरसेवकांचे नीतीधैर्य खचवणारे ठरते. त्यामुळे भाजपचे नेते, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक शहर प्रभारी जयकुमार रावल अशा सर्वांनीच सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी केलेली पराकाष्ठा अखेर यश देणारी ठरली.

Web Title: BJP heavy on Shiv Sena for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.