भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

By संजय पाठक | Published: June 13, 2023 05:30 PM2023-06-13T17:30:37+5:302023-06-13T17:30:52+5:30

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार  हे बुधवारी (दि 14) नाशिकमध्ये येणार असून रात्री ते कार्यकर्त्यांसमवेत 'टिफिन पे चर्चा' करणार आहेत.

BJP leader Ashish Shelar's tiffin pe discussion in Nashak tomorrow; JP Nadda's meeting cancelled, now he will come to Nashik on June 26 | भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

googlenewsNext

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्ष पूर्ण केल्याने भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार  हे बुधवारी (दि 14) नाशिकमध्ये येणार असून रात्री ते कार्यकर्त्यांसमवेत 'टिफिन पे चर्चा' करणार आहेत.

 आशिष शेलार हे उद्या सायंकाळी नाशिक मध्ये आल्यानंतर त्यांची बुद्धीजीवी वर्गासमवेत पंचवटी येथे बैठक होणार आहे त्यानंतर रात्री मध्य नाशिक मतदार संघातील कार्यकर्त्यांसमवेत 'टिफिन मीटिंग' होणार आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची 16 जून रोजी नाशिक मध्ये सभा होणार होती ती रद्द करण्यात आली असून ती आता 26 जून रोजी होणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
 

Web Title: BJP leader Ashish Shelar's tiffin pe discussion in Nashak tomorrow; JP Nadda's meeting cancelled, now he will come to Nashik on June 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.