विधान परिषदेसाठी भाजपामध्ये रस्सीखेच नगरपालिका निवडणुकांच्या भवितव्यावर उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:19 AM2017-11-30T00:19:34+5:302017-11-30T00:24:07+5:30
नाशिक : येत्या जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र तूर्तास इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांच्या निवडणूक निकाला वरच काही संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबूून असल्याची चर्चा आहे.
नाशिक : येत्या जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र तूर्तास इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांच्या निवडणूक निकाला वरच काही संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबूून असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने तर आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिवाजी सहाणे की नरेंद्र दराडे या नावांवर पडदा टाकून नरेंद्र दराडे यांनाच पुढे चाल दिल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे, तर राष्टÑवादी कॉँग्रेसकडून या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार जयंत जाधव इच्छुक नसल्याचे सांगितले जात असले, तरी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ बाहेर आल्यानंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्तास राष्टÑवादीकडून आजमितीस माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी आमदार दिलीप बनकर या दोघांच्याच नावांची चर्चा आहे. भाजपाने मात्र या सर्व बाबतीत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल व नगरसेवक सचिन ठाकरे यांच्यावर, तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते व आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. तसेच भाजपात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या एका राष्टÑवादीच्या नेत्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी सोपविण्यात आल्याचे कळते. विधान परिषदेसाठी भाजपाकडून केदा अहेर, सुनील बागुल, वसंत गिते आदी इच्छुक आहेत.
काही दिवसांपूर्वीच भाजपा कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतलेले जिल्हा बॅँकेचे संचालक अॅड. संदीप गुळवे हेही भाजपाकडून विधान परिषदेसाठी नशीब आजमावू शकतात. त्यामुळेच त्यांनी इगतपुरी नगरपालिका निवडणुकांची चर्चा त्यावेळी पालकमंत्र्यांशी केल्याचे समजते. एकूणच भाजपाकडून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याच्या जय्यत तयारीत असल्याचे चित्र आहे. मात्र शिवसेनेने प्रसाद लाड यांना विधान परिषदेसाठी पाठिंबा दिलेला असल्याने त्या बदल्यात नाशिकला शिवसेना भाजपाकडून पाठिंबा घेण्याच्या तयारीत आहे.राष्ट्रवादीचे पदाधिकारीही इच्छुकभाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविण्यासाठी त्र्यंबकेश्वरची जबाबदारी असलेले राष्ट्रवादीचे एक पदाधिकारीही इच्छुक असल्याचे कळते. मात्र या निवडणूक निकालांच्या जय-पराजयाच्या निर्णयानंतरच इच्छुकांची उमेदवारी निश्चिती होण्याची चिन्हे आहेत.