राष्टवादीच्या बैठकीला भाजपा आमदाराची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:07 AM2018-05-01T02:07:28+5:302018-05-01T02:07:28+5:30
भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे भाजपामधीलच ज्येष्ठ सदस्य म्हणून गणले जाणारे बंधू अद्वय हिरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हिरे बंधूंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक लक्षात घेता माजी मंत्री प्रशांत हिरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे भाजपामधीलच ज्येष्ठ सदस्य म्हणून गणले जाणारे बंधू अद्वय हिरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हिरे बंधूंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक लक्षात घेता माजी मंत्री प्रशांत हिरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबीयांची राष्टÑवादीच्या नेत्या, पदाधिकाऱ्यांशी जवळिक निर्माण झाली असून, छगन भुजबळ यांच्या तुरुंगवासाने जिल्ह्णात राष्टÑवादी नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने राष्टÑवादीनेही हिरे कुटुंबीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मध्यंतरी नाशिक दौºयावर आलेले पक्षाचे नेते शरद पवार यांनी श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट हिरेंच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात हिरे कुटुंबीयांची पावले पुन्हा राष्टÑवादीकडे वळू लागल्याचे बोलले जात असतानाच रविवारी पुणे येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी बोलविलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला भाजपाचे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे बंधू जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष व मालेगाव तालुका भाजपाचे ज्येष्ठ सदस्य अद्वय हिरे यांनी हजेरी लावून पक्षाच्या कामकाजात सहभाग नोंदविला. या बैठकीस उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्णातील राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. हिरे बंधूंनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे स्वागतही केले. मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरे बंधूंना राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करायचा असून, पुण्याच्या बैठकीत हजर असलेल्या राष्टÑवादीच्या नेत्यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते.
प्रशांत हिरे यांना उमेदवारी शक्य
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवाराची उणीव असल्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिरे यांचे सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो शिवाय राष्टÑवादीलादेखील त्यांच्या अनुभवाचा लाभ होण्याची शक्यता असल्याने राष्टÑवादीने प्रशांत हिरे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशांत हिरे यांना उमेदवारी शक्य
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवाराची उणीव असल्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिरे यांचे सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो शिवाय राष्टÑवादीलादेखील त्यांच्या अनुभवाचा लाभ होण्याची शक्यता असल्याने राष्टÑवादीने प्रशांत हिरे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.