भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:32 PM2018-07-26T23:32:46+5:302018-07-26T23:37:01+5:30

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण्याची मागणी केली असून, त्याविषयी मात्र एकाही आमदाराने ठोस भुमिका स्पष्ट न केल्याने गुरुवारी (दि.२६) भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.

BJP MLAs resignation drama | भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य

भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण्याची मागणी केली असून, त्याविषयी मात्र एकाही आमदाराने ठोस भुमिका स्पष्ट न केल्याने गुरुवारी (दि.२६) भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.
चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार राहुल अहेर यांनी गुरुवारी (दि.२६) मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी जमले असताना आंदोलकांची भेट घेत आपण आरक्षणासाठी समाजासोबत असल्याचे सांगितले. समाजाच्या प्रतिनिधींना त्यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले असता त्यांनी आंदोलनस्थळीच राजीनाम्याचे पत्र लिहिले. परंतु हे पत्र कोणाला उद्देशून आहे. याविषयी पत्रावर उल्लेख करणे टाळतानाच ‘हेच माझ्या राजीनाम्याचे पत्र समजावे ’ असा उल्लेख पत्रावर केला आहे, तर पश्चिम नाशिक मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही दुपारी मराठा समाज प्रतिनिधींकडे राजीनाम्याचे पत्र सोपवले. परंतु, हे पत्र त्यांनी चक्क मराठा क्रांती मोर्चाला उद्देशून राजीनामा पत्र लिहिले आहे. नियमानुसार आमदाराने राजीनामा पत्र विधानसभा अध्यक्षांना देणे क्रमप्राप्त आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी याचप्रकारे विधानसभा अध्यक्षांना ई- मेलद्वारे राजीनामे पाठवून दिला आहे.  परंतु, नाशिकमध्ये आमदारांनी अशाप्रकारे समाज प्रतिनिधींकडे आपला राजीनामा सोपवल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेचा वर्षाव सुरू झाला.
आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा द्या!
मराठा समाजाला आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या दबावामुळे काही आमदारांनी राजीनाम्याची तयारी दाखविली आहे. परंतु त्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांनी केले आहे. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला व राजीनाम्याचे पत्र दिले. परंतु सीमा हिरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला नसल्याचेही नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: BJP MLAs resignation drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.