भाजपा आमदाराचा रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:42 AM2017-09-28T00:42:29+5:302017-09-28T00:42:38+5:30
शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेबाबतचा दिलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावत दुसºयाच जागेचा ठराव केल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी (दि.२७) महापालिका मुख्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाºयांसह आयुक्तांनाही त्यांनी जाब विचारला. त्यांच्या या रुद्रावतारापुढे भाजपा पदाधिकाºयांची पुरती भंबेरी उडाली.
नाशिक : शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेबाबतचा दिलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावत दुसºयाच जागेचा ठराव केल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी (दि.२७) महापालिका मुख्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाºयांसह आयुक्तांनाही त्यांनी जाब विचारला. त्यांच्या या रुद्रावतारापुढे भाजपा पदाधिकाºयांची पुरती भंबेरी उडाली. शासनाच्या अनुदानातून शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली असून, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आल्या आहेत. मात्र, जागेबाबत टोलवाटोलवी होत असल्याने रुग्णालयाचा प्रस्ताव रखडला आहे. फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतच्या जागेत स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. आयुक्तांनी तसा प्रस्तावही महासभेत ठेवला होता. परंतु, फरांदे यांचे विरोधक मानले जाणारे भाजपाचे उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या प्रभागातील सदरची जागा असल्याने त्यास विरोध झाला. उपमहापौरांनी उपसूचना देत टाकळीरोड येथील जागा प्रस्तावित केली आणि तसा ठराव महासभेने करून प्रशासनाकडे पाठविला. प्रशासनानेही तो शासनाकडे रवाना केला. महापालिका महासभेने भाजपा आमदाराचा प्रस्ताव टोलवून लावल्याने संतप्त झालेल्या आमदार फरांदे या दुपारी महापालिका मुख्यालयात आल्या. यावेळी महावितरणच्या अधिकाºयांसमवेत आयुक्त व महापौरांसह पदाधिकाºयांची बैठक सुरू होती. या बैठकीतच आमदारांनी जाऊन भाजपाच्या पदाधिकाºयांना सुनावले आणि आयुक्तांनाही जाब विचारला. यावेळी वाद होऊ नये म्हणून उपमहापौरांनी तेथून काढता पाय घेतला तर अन्य पदाधिकाºयांनीही चुप्पी साधली.