भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:53 AM2019-06-08T00:53:27+5:302019-06-08T00:54:28+5:30
व्यवसायासाठी मुद्र्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवूून महिलांकडून पैसे घेत अनेक महिलांची फसवणुकीचा प्रकार घडला असून, लोन मिळत नसल्याचा अनुभव आल्याने पैसे परत मागायला गेलेल्या महिलेला फसवणूक करणाºया महिलेकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सिडकोत (दि.७) घडली.
सिडको : व्यवसायासाठी मुद्र्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवूून महिलांकडून पैसे घेत अनेक महिलांची फसवणुकीचा प्रकार घडला असून, लोन मिळत नसल्याचा अनुभव आल्याने पैसे परत मागायला गेलेल्या महिलेला फसवणूक करणाºया महिलेकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सिडकोत (दि.७) घडली. या फसवणूक प्रकरणातील संशयित महिला ही भाजपाची महिला पदाधिकारी असल्याचे वृत्त असून, संबंधित महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी पीडित महिलांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणातील पीडित महिला सीमा सेजल यांनी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित भाजपा महिला पदाधिकारी व तिचा मुलगा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, महिलांना केवळ ६० दिवसांत मुद्रा योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अनेक महिलांकडून पैसे जमा केले. त्यानंतर ५ ते ६ महिने उलटूनही कर्ज न मिळाल्यामुळे पैसे परत मागायला गेलेल्या महिलांना संबंधित भाजपा पदाधिकारी व तिच्या मुलाने दमदाटी व मारहाण केल्याचे प्रकार घडल्याने अनेक महिला घाबरून पैसे परत मागायला गेल्याच नाही.
सीमा सेजल यांनाही पैसे मागितल्यामुळे मारहाण करण्यात आल्याने त्यांनी हिंमत करून अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांनी वरवर कारवाईचा देखावा केल्याने फसवणूक झालेल्या सर्व महिला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार असून, भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडेही संबंधित महिला पदाधिकाºयाची तक्र ार करणार असल्याचे सेजल यांनी सांगितले.