रेमडेसिविरसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची कंपनीकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:33+5:302021-04-13T04:13:33+5:30
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक रुग्णांना डॉक्टर उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शन्स देत आहेत. मात्र, इंजेक्शनची टंचाई ...
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक रुग्णांना डॉक्टर उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शन्स देत आहेत. मात्र, इंजेक्शनची टंचाई असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. या इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू असून, हजारो रुपये आकारले जात आहेत. त्यातच नाशिक महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात सुमारे साडे नऊशे रुग्ण उपचार घेत आहेत. इंजेक्शनचा साठा संपल्याने त्यातील अनेक रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गटनेते जगदीश पाटील आणि हिमगौरी आडके यांनी मायलॉन कंपनीचे भारत व दक्षिण आफ्रिका हेड पी. के. सिंग यांनी नाशिक शहरासाठी साठा देण्याचे मान्य केले आहे. त्या अनुषंगाने आता महापालिका प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी पाटील व आडके यांनी केली आहे.