अघोषित लॉकडाऊनला भाजपचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:37+5:302021-04-08T04:15:37+5:30
शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत अघोषित संपूर्ण लॉकडाऊन केले असून त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शासनाने ...
शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत अघोषित संपूर्ण लॉकडाऊन केले असून त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शासनाने लागू केलेल्या या अघोषित लॉकडाऊनला कळवण तालुका भाजपाने विरोध केला असून परिस्थितीनुसार नियम शिथिल करण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, डॉ. अनिल महाजन, संदीप अमृतकार, सचिन सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिक व कामगार वर्गाचा आर्थिक कणा मोडला गेला. पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण करून व्यापारी, व्यावसायिक व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आणली आहे. मागील लॉकडाऊनच्या संकटातून सावरत असताना पुन्हा व्यापारी वर्ग उभा राहण्याची तयारी करीत होता. कामगारांच्या हाताला काम मिळत होते.
अचानक अघोषित लॉकडाऊन लागल्यामुळे संपूर्ण व्यापारी, व्यावसायिक व कामगार वर्ग हादरला आहे. बँकेचे कर्ज, वीजबिल इत्यादी प्रमुख देणे असतानाही मध्ये राज्य शासनाने व स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, वीजबिल व कुठल्याही करात सवलत दिली नाही.
अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ठरावीक निर्बंधांची गरज असताना स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन व्यापारी-व्यावसायिक वर्गाला दिलासा मिळेल असा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
इन्फो
अशा आहेत मागण्या
किमान फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा व सॅनिटायझर, लस तसेच कोविड टेस्ट करून सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. पोलीस व स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये. कळवण विभागातील बाजारपेठा विशेष बाब म्हणून सूट द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
फोटो - ०७कळवण बीजेपी
सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देतांना भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, संदीप अमृतकार, सचिन सोनवणे आदी.
===Photopath===
070421\07nsk_33_07042021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७कळवण बीजेपी