आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मालेगावी भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:21+5:302021-07-07T04:16:21+5:30
अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची मागणी आक्रमकपणे मांडली होती. मात्र सत्ताधारी पक्षाने भाजपच्या १२ आमदारांवर ...
अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची मागणी आक्रमकपणे मांडली होती. मात्र सत्ताधारी पक्षाने भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप करत न्यायहक्कासाठी उचललेला आवाज दडपण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, नंदू सोयगावकर, हरिप्रसाद गुप्ता, कुणाल सूर्यवंशी, भरत पोफळे, देवा पाटील, स्वप्नील भदाणे, सुनील शेलार, श्याम गांगुर्डे, धनंजय पवार, राहुल पाटील, शक्ती सौदे, सतीश उपाध्ये, निखिल सोनार, संजय काळे, स्वप्निल भदाणे, याेगेश ठाकरे, विशाल नेरकर, भूषण शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
फोटो फाईल नेम : ०६ एमजेयुएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन - भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी मालेगाव तहसील कार्यालय आवारात निदर्शने करताना भाजपचे सुरेश निकम, नंदूतात्या सोयगावकर, हरिप्रसाद गुप्ता, कुणाल सूर्यवंशी, भरत पोफळे, देवा पाटील, स्वप्निल भदाणे, सुनील शेलार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते.
060721\06nsk_1_06072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.