देान विषय समित्या राखण्यात भाजपला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:05+5:302020-12-11T04:41:05+5:30
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) या दोन्ही निवडणुका पार पडल्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व ...
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) या दोन्ही निवडणुका पार पडल्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी भाजपच्या स्वाती भामरे व मीरा हांडगे या दोघींचेच एकेकच उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यानंतर पार पडलेल्या विधी समितीच्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठीदेखील अनुक्रमे भाजपच्या कोमल मेहरोलिया व भाग्यश्री ढोमसे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांचीदेखील पीठासीन अधिकारी मांढरे यांनी बिनविरोध निवड घोषित केली. तथापि, यासाठीदेखील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना झगडावे लागले. दोघींच्या सह्यांमध्येदेखील तफावत आल्याने अखेरीस देाघींना शासकीय दस्तावेज उपलब्ध करून द्यावे लागले. त्यानंतर त्यांचे अर्ज वैध ठरले.
इन्फो..
गैरहजर असूनही हांडगे यांची वर्णी
महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या मीरा हांडगे यांनी अर्ज दाखल केला असला, तरी त्या निवडणुकीत केाणत्याही प्रकारे सहभागी नव्हत्या, त्या प्रत्यक्षात किंवा ऑनलाइनदेखील हजर नसतानाही त्यांना संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबद्दल सभास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.