शिवसंपर्क अभियानांतर्गत भाजप टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:08+5:302021-07-26T04:13:08+5:30
नाशिक : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्यात आले ...
नाशिक : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्यात आले असून, साडेचार वर्षांतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणा व या पक्षात असलेल्या गटबाजीचा फायदा उचलून शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी खंबीर पावले उचला, असे आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने २१ ते २४ जुलैदरम्यान नाशिक महानगरातील ३१ प्रभागांत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. त्यावेळी भाजपला टार्गेट करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना शिवसेना उपनेते माजीमंत्री बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खा.हेमंत गोडसे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, नयना घोलप, मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका म्हणजे शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्न असून, प्रतिस्पर्धी पक्षाला कमी न लेखता, सर्वत्र शिवसेनेची सत्ता कशी आणता येईल, याचा विचार सर्वांनी करावा आणि आतापासूनच तयारीला लागा, असे प्रतिपादन संपर्कप्रमुख भाउसाहेब चौधरी यांनी केले. माजी मंत्री बबनराव घोलप आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शिवसेना शाखाप्रमुख आपल्या दारी’ या अभियानाची माहिती दिली.
या बैठकांना माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, श्याम खोले, सचिन मराठे, महेश बडवे, माजी महानगर संघटक बाळासाहेब कोकणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, महीला आघाडी माजी जिल्हा संघटक प्रेमलता जुन्नरे, माजी महानगर संघटक शोभा मगर, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, संदेश लवटे, महाराष्ट्र वाहतूक सेना उत्तर महाराष्ट्र संघटक अजिम सैय्यद, श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, शिव वाहतूक सेना अध्यक्ष शिवाजी भोर, संजय गायकर, सोमनाथ गुंभाडे, राजेंद्र वाकसरे यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.