भाजपाने नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसला : समीर भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:30 AM2018-10-28T00:30:37+5:302018-10-28T00:31:39+5:30
नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडूनपाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही वेळोवेळी सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जात आहे. नाशिक शहरातील करवाढ करतानाही नाशिककरांनी सत्ताधाऱ्यांच्या नौटंकीचा अनुभव घेतला आहे. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता असताना नाशिकचे पाणी डोळ्यादेखत जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे जलसंपदा विभागाचे मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचे पाणी पळविले जाणे ही सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांची दिशाभूल आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधाºयांकडून गंगापूरमधील पाण्यासाठी विषय घेतला जातो, हा नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. नाशिक शहरातील सत्ताधाºयांनी नाशिकचे दत्तक पिता मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री असलेले जलसंपदामंत्री यांच्याकडे जाऊन नाशिकमधील तीव्र दुष्काळाची वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याची आवश्यकता होती. जायकवाडीला सोडल्या जाणाºया पाण्याबाबत न्यायालयाचा निर्णय म्हणून सरकारकडून सांगितले जाते.
अन्याय न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावा
कोर्टाने निर्णय दिला असे सांगून हात झटकायचे; मात्र नाशिककरांवर होणारा अन्याय सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे ही सरकारची जबाबदारी नाही काय? असा सवालही समीर भुजबळ यांनी केला आहे. नाशिककरांच्या हक्काचे पाणी राजकीय लाभाकरिता इतरत्र देणे हे सत्ताधाºयांना शोभनीय नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.