पंचवटीत भाजपचाच सभापती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:36 PM2020-10-08T23:36:50+5:302020-10-09T01:14:25+5:30
पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. पंचवटी प्रभागात दरवेळेस भाजपाला बहुमत मिळत असल्याने भाजपाचा सभापती होतो.
पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. पंचवटी प्रभागात दरवेळेस भाजपाला बहुमत मिळत असल्याने भाजपाचा सभापती होतो.
यंदा येत्या गुरूवारी (दि.15) प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. पुर्णपणे भाजपाला बहुमत असल्याने यंदा भाजपाचा सभापती होणार हे निश्चित असून भाजपातर्फे नवीन चेहऱ्याला संधी देत निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच प्रभाग समिती सभापती म्हणून महिला ऐवजी पुरुष नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढला असून त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यावर्षी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पंचवटी विभागातील सहा प्रभागात 24 नगरसेवक निवडून आलेले असून प्रभाग 1, 2, 3, 4, 5, 6 या सहा प्रभागांचा समावेश होतो. मनपाच्यानिवडणुकीत निवडून आलेल्या 24 नगरसेवकांपैकी शिवसेना-1, मनसे-2, अपक्ष-2, तर भाजपा-19, असे पक्षीय बलाबल आहे.
तर भाजप नगरसेवक शांता हिरे यांचे निधन झाल्याने भाजपकडे आता 18 सदस्य आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य निवडणुकीत निवडून आले नाही.
भाजपाने पंचवटीतील नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य, विधी समिती, अन्य विविध समित्यांवर नियुक्ती केल्याने सर्वांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी नवीन चेहºयाला संधी दिली जात आहे. भाजपाने पहिल्यावेळी 2017 ला महिला उमेदवार म्हणून प्रियंका माने यांना संधी दिली होती तर दुसºया व तिसºया वर्षी भाजपच्या महिलांना सभापती केले होते. आता पंचवटी प्रभाग सभापती पदाचा कार्यकाल पुर्ण होऊन अनेक महिने लोटले आहे नवीन चेहरा म्हणून यावर्षी कदाचित पुरुष उमेदवाराला पक्षाकडून संधी देण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे रुची कुंभारकर, पुंडलिक खोडे, अरुण पवार, सुरेश खेताडे, यांना कोणतेही पद दिलेले नाही त्यामुळे चौघांपैकी एकाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडू शकते.मात्र असे असले तरी भाजप नेते जो उमेदवार ठरवतील तो प्रभाग सभापती होणार हे निश्चित असले तरी उमेदवार म्हणून महिला किंवा पुरुष नगरसेवकाला संधी मिळू शकते.