आगामी निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:22+5:302021-06-19T04:10:22+5:30

सिन्नर : येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवावा, पक्ष मजबुतीकरणाकडे लक्ष द्यावे, असे ...

BJP will fight on its own in the upcoming elections | आगामी निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल

आगामी निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल

Next

सिन्नर : येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवावा, पक्ष मजबुतीकरणाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्राचे विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी केले. येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यासपीठावर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, तालुका प्रभारी शरद कासार, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, सुभाष कर्पे उपस्थित होते. दरम्यान, पंडित दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपाध्यक्ष दत्ता गोसावी, अतुल गुजराथी, सरचिटणीस किशोर देशमुख, शहर उपाध्यक्ष हितेश वर्मा, शरद जाधव, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सचिन गोळेसर, रामनाथ डावरे, दिनकर कलकत्ते, ज्ञानेश्र्वर कुऱ्हाडे, राजेश कपूर, महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे, उपाध्यक्ष संगीता अव्हाड, रूपाली काळे, सुमन जोशी, जिजाबाई सोनवणे, मंगला झगडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १७ सिन्नर बीजेपी सिन्नर येथे कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीप्रसंगी भाजपा विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुनील बच्छाव, शरद कासार, बाळासाहेब हांडे, जयंत आव्हाड, चंद्रकला सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते.

Web Title: BJP will fight on its own in the upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.