भाजपामुळे वाढणार चुरस

By admin | Published: February 1, 2017 10:27 PM2017-02-01T22:27:09+5:302017-02-01T22:27:24+5:30

महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष !

BJP will increase due to thumping | भाजपामुळे वाढणार चुरस

भाजपामुळे वाढणार चुरस

Next

अशोक देशमुख ओतूर
कळवण तालुक्यातील अभोणा गटातील नरूळ गण यंदा
सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला असून, अनेक नेते सौभाग्यवतींना उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच या गणात भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने जोरदार चुरस वाढणार आहे.
सन १९९२ ते १९९७ या काळात या गणातील अपक्ष उमेदवार
मावंजी गायकवाड यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. १९९७ साली
मोहनदरी गण होता. त्यानंतर १९९२, २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिकमध्ये नरूळ गण अस्तित्वात आला. प्रत्येक वेळी अभोणा गटाचे यशवंत गवळी हे या गणाचे केंद्रबिंदू ठरले. या पाच पंचवार्षिकमध्ये चार वेळा काँग्रेसचे उमेदवार, तर एकवेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नरूळ गणातून मावजी गायकवाड, बेबीताई चव्हाण (१९९७), संपत भोये (२००२), बळीराम देवरे (२००७), बेबीबाई गावित (२०१२) यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
कळवण तालुक्यातील चारही गटात अनेक राजकीय मतप्रवाह बदललेत तरी अभोणा गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत काँग्रेसनेच केले आहे. त्यातील नरूळ गणातील पाचपैकी चार वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त एक वेळा १९९२ मध्ये जनरल पुरुष जागेवर अनु.जमातीचे अपक्ष उमेदवार मावजी गायकवाड विजयी झाले होते व ते कळवण उपसभापतीही झाले होते. तसेच २००२ मध्ये या गणातून निवडून आलेले संपत भोये यांनाही उपसभापतिपदाचा मान मिळाला होता. गेल्या २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बेबीताई गावित
निवडून आल्या असून, त्या विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने फारशी परिणामकारक कामगिरी त्यांना करता आली नाही.
या गणात भाजपाचेही पदाधिकारी काही वर्षांपासून सक्रिय झाले असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ओतूर धरणाच्या कामाला चालना दिल्यामुळे भाजपाचा मतप्रवाह वाढला आहे. तर राष्ट्रवादीचा मतप्रवाह कमी झाला आहे. तसेच आमदार जे.पी. गावित यांनी प्रत्यक्षपणे ओतूर धरणाचा पाणी गळतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम सुरू केल्याने माकपाचे प्राबल्य वाढले आहे.

Web Title: BJP will increase due to thumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.