भाजपसमोर ठाकणार महाआघाडीचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:27 PM2019-12-22T23:27:16+5:302019-12-23T00:19:11+5:30

राज्यात शिवसेना- कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला जाण्याची चिन्हे असून, त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मात्र मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

BJP will know in front of Maha front! | भाजपसमोर ठाकणार महाआघाडीचे आव्हान !

भाजपसमोर ठाकणार महाआघाडीचे आव्हान !

Next
ठळक मुद्देकोंडीत पकडण्याची शक्यता : चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार

भगवान गायकवाड ।
दिंडोरी : राज्यात शिवसेना- कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला जाण्याची चिन्हे असून, त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मात्र मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
दिंडोरी नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत शिवसेना व एक अपक्ष नगरसेवक आहे, तर भाजपने स्वतंत्र गट केला असून, त्यात तीन अपक्ष व कॉँग्रेस, भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक नगरसेवक या विरोधी गटात आहे. पहिले दोन वर्षे कॉँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते नगराध्यक्ष होते व राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सचिन देशमुख होते. सहा महिने विरोधी गटाचे प्रमोद देशमुख व आशाताई कराटे यांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. सध्या राष्ट्रवादीच्या रचना जाधव नगराध्यक्ष व कैलास मवाळ उपनगराध्यक्ष आहेत. गेल्यावेळी कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत कॉँग्रेसने जास्त जागा लढवल्या होत्या. मात्र त्यावेळी चारोस्कर कॉँग्रेसमध्ये होते. आता ते शिवसेनेत असल्याने कॉँग्रेसचा वाटा सेनेला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व व चारोस्कर यांच्यात दिलजमाई होण्यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा खेडगाव जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत झालेला तालुका विकास आघाडीचा प्रयोग आगामी नगरपंचायत निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्यावेळी भाजप व शिवसेना दोघेही स्वतंत्र लढले व त्याचा फटका दोघांनाही बसला. भाजपला अवघी एकच जागा मिळवता आली, मात्र राज्यात भाजपचे सरकार असताना अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत येथे भाजपने आपली संख्या वाढवली असून, भाजप या निवडणुकीत टक्कर देण्यासाठी सज्ज राहणार आहे. मात्र ऐनवेळी काही समीकरणे जुळून आल्यास पुन्हा शहर विकास आघाडीचा प्रयोग राबविला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अद्याप नियोजनात्मक विकासाच्या प्रतीक्षेत
दिंडोरी शहरात नगरपंचायत झाल्याने शहराचा वेगाने विकास होईल अशा अपेक्षा होत्या. त्यादृष्टीने काही विकासकामे मंजूर होत ते सुरूही झाले; पण त्यात नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे. शहरात भुयारी गटारी सर्वत्र झाल्या, मात्र त्या करत असताना रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सर्व उपनगरांमध्ये रस्त्यांची समस्या बिकट आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने हटवली. परंतु जागेवर अवास्तव पार्किंग होत वाहतूक कोंडी कायम आहे. शहरात पार्किंगची समस्या जटिल आहे. शहरात विकासाच्या विविध योजना मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा कायम आहे.

Web Title: BJP will know in front of Maha front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.