पंचवटीत सभापतिपद भाजपच राखणार; नाव मात्र गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:41+5:302021-07-15T04:11:41+5:30
पंचवटी : गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत सर्वात जास्त १९ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय संपादन ...
पंचवटी : गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत सर्वात जास्त १९ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने होऊ घातलेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सभापतिपद भाजपकडेच राहाणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र पक्षात अनेक इच्छुक असल्याने पक्ष कोणाची वर्णी लावतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
येत्या आठवड्यात प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. पूर्णपणे भाजपला बहुमत असल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदा भाजपचा सभापती होणार हे जवळपास निश्चित असले तरी भाजप नवीन चेहऱ्याला संधी देत निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता आहे. पंचवटी विभागात असलेल्या सहा प्रभागात २४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात भाजपचे -१८, मनसे-२, अपक्ष-२, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य निवडणुकीत निवडून आले नाही. भाजपने पंचवटीतील अनेक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य, विधी समिती व अन्य समित्यांवर नियुक्ती केल्याने सर्वांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी नवीन चेहऱ्याला संधी दिली जात आहे. भाजपने सलग चारवेळा महिला उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे आता भाजप पाचव्या वर्षी पुन्हा महिलांना संधी देते की ज्यांच्या पदरी पाच वर्षात एकही पद मिळाले नाही त्यामुळे त्यांना सभापतिपदाची संधी देणार का हे उद्या होणाऱ्या भाजप बैठकीत ठरणार आहे.
इन्फो=
प्रभाग सभापती दावेदार
महापालिका पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप, नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे यांना पाच वर्षात कोणत्याही प्रकारचे पद मिळाले नाही त्यामुळे यावर्षी पुरुष नगरसेवक म्हणून कुंभारकर, सानप, खेताडे संधीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे भाजपतर्फे पूनम सोनवणे इच्छुक आहे.