भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 07:40 PM2017-09-18T19:40:39+5:302017-09-18T19:40:56+5:30

BJP won four out of seven seats | भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय

भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय

Next


नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश आले. सात जागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर झाला. यात मुख्यनागरी गट तथा महापालिका गटातील सहा जागांमध्ये नाशिक आणि मालेगावने प्रत्येकी तीन जागा मिळवत बरोबरी साधली, तर संक्र मणकालीन गटातील एका जागेसाठी निफाड येथील भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार विजयी झाले.
नियोजन भवन येथे सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरु वात झाल्यानंतर प्रथम मुख्यनागरी गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील चार जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात एकूण झालेल्या २०१ मतांपैकी १५ मते बाद झाल्याने १८६ मतेच वैध ठरली. मतमोजणी करताना एका मताचे मूल्यांकन शंभरामध्ये करण्यासोबतच कमाल मतांचा कोटा ३७.२१ अर्थात ३७२१ असा निश्चित करण्यात आला. या कोट्यानुसार मतांचे मूल्यांकन करून मतमोजणीत भाजपाचे योगेश रामराव हिरे यांनी पहिल्याच फेरीत ४७ म्हणजे ४७०० मते मिळवित विजय मिळवला, तर शिवसेनेचे चंद्रकांत महादेव खाडे यांनी ४२ म्हणजे ४२०० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद यांनी ३९ म्हणजे ३९०० मूल्यांकनाची मते मिळवून विजय मिळवला, तर भाजपाचे सुनील गायकवाड यांना ३२०० आणि नंदकुमार वाल्मीक सावंत यांना २६०० मूल्यांकनाची मते पडली. या दोन्ही उमेदवारांनी कोटा पूर्ण न केल्याने त्यांच्यासाठी दुसरी फेरी झाली. त्यात सर्वाधिक मते पडलेल्या योगेश हिरे यांची कोट्यापेक्षा अधिक मते म्हणजे ९७९ कोटा मूल्यांकनाच्या अतिरिक्त मतांची पुनर्मांडणी करूनही सावंत यांना ०.००१ मूल्यांकनाची मते मिळाली. दुसºया क्रमांकाची अतिरिक्त मते मिळवूनही सावंत यांच्या मतांचे मूल्यांकन सर्वांत कमी असल्याने मतमोजणी आणि मूल्यांकन पद्धतीच्या नियमांनुसार चौथ्या जागेसाठी सुनील गायकवाड यांना विजयी घोषित करून सावंत पराभूत झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, सकाळी प्रथम संक्र मणकालीन म्हणजेच नगरपंचयात गटाच्या मतमोजणीत निफाडचे राजाराम शेलार यांनी प्रमोद देशमुख यांचा दहा मतांनी पराभव केला. शेलार यांना ५२, तर देशमुख यांना ४२ मते मिळाली, तर मुख्य नागरी गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव गटात दोन जागांसाठी तीन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत भाजपाच्या पुष्पा आव्हाड आणि शिवसेनेच्या आशा अहिरे यांना प्रत्येकी ७६ व मालेगावच्या शानऐहिंद निहाल अहमद यांना ३५ मते पडल्याने त्यांचा पराभव झाला.
 

Web Title: BJP won four out of seven seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.