नाशिकमध्ये फडणवीस यांचे फलक हटविल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:25 PM2021-07-08T12:25:46+5:302021-07-08T12:28:18+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार हे यापूर्वी नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का ?
नाशिक - महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी लावलेले भाजपाचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला. हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी समर्थकांकडून करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे यापूर्वी नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का ? असा प्रश्न भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने फलक हटविले, असा आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्याशी या पदाधिकाऱ्यांनी फोन केला असता त्यांनी आयुक्तांना सांगा असे म्हणत फोन कट केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापात भर पडली.