भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:02 PM2020-08-05T19:02:11+5:302020-08-05T19:04:07+5:30
सिन्नर: अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजनाच्या सभारंभाप्रसंगी सिन्नर येथे रामरक्षास्त्रोत्र व महाआरती करण्याचे नियोजन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकातून आणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, सरचिटणीस किशोर देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली सीताराम मंदिरात रामरक्षास्त्रोत्र व महाआरतीचे नियोजन करण्यात आले होत. त्याची परवानगी मागिण्यात आली होती. मात्र सदर मंदिर बंद असल्याने परवानगी नाकारण्यात आली होती.
बुधवारी दुपारी बारा वाजता हांडे, शिंदे, देशमुख यांच्यासह शहराध्यक्ष सोनल लहामगे, रवी नाठे, छबू कांगणे, नितीन सरोदे, हितेश वर्मा, सचिन गोळेसर यांच्यासह र्कायकर्ता शिवाजी चौकात जमा झाले. सीताराम मंदिराला कुलूप असल्याने व मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त असल्याने या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात येऊन सोशल डिस्टींगसिंग पाळत आरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. रसेडे यांनी हांडे, देशमुख व शिंदे यांना पोलीस गाडी घेऊन ठाण्यात नेले. त्यानंतर उर्वरित कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. सुमारे तीन तास या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसविण्यात आल्यानंतर व भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी सोडून दिले.