मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:33 AM2018-11-24T01:33:09+5:302018-11-24T01:33:31+5:30

भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

The BJP is worried despite the transfer of the Mundhe | मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

मुंढे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

Next
ठळक मुद्देपक्षीय प्रतिमेचा प्रश्न : आयुक्तांच्या बदलीचे श्रेय घेणे अंगलट येण्याची शक्यता

नाशिक : भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खुल्यापणाने हा गट मुंढे यांच्या बदलीच्या प्रकरणात जाहीरपणे काही बोलत नसला तरी, आगामी निवडणुकीत जनतेकडून मुंढे यांच्या बदलीबाबत जाब विचारल्यास काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त मुंढे यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंढे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंढे यांनी आपल्या पद्धतीनेच कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, गटार या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी मुंढे जनतेत लोकप्रिय तर झालेच, परंतु काम न करणाºया महापालिकेच्या अधिकाºयांना नकोसे तर नको त्या कामात ‘अर्थ’ शोधणाºया लोकप्रतिनिधींना अडचणीचे ठरले होते. लोकांना जे हवे ते देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवून नागरिकांच्या मनपाच्या संबंधित तक्रारी अवघ्या चोवीस तासात सोडविण्यास सुरुवात केल्याने त्यांना जनमानसातून मिळत असलेला पाठिंबा सत्ताधारी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच मुंढे जर आणखी काहीकाळ नाशकात थांबले तर भाजपासाठी ते अडचणीचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला. मुंढे यांची आता बदली झाली असली तरी, मुंढे यांच्या कामकाजावर समाधानी असलेल्या नाशिककरांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार आहे.
प्रतिमा मलीन : पक्षांतर्गत दोन गट
मुंढे यांच्या कायदेशीर कामकाजामुळे मूठभरच लोकांना त्रास झाला व ज्यांना झाला त्यांचा जनमानसातील वावर अगदीच अल्प आहे. त्यांच्यापासून पक्षाला कितपत फायदा होईल, असा विचार आता भाजपातील मंडळी करू लागली असून, निव्वळ महापालिकेतून स्वहित साधण्यासाठीच मुंढे यांच्या बदलीला प्रतिष्ठेचा प्रश्न करणाºयांमुळे भाजपाला नुकसानच होण्याची भीती खासगीत व्यक्त होऊ लागली आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे मुंढे यांच्या बदलीचे समर्थन करीत असल्यामुळे तर भाजपा भ्रष्टाचाराला पाठिंबा देते, असा संदेश जनमानसात गेला आहे.

Web Title: The BJP is worried despite the transfer of the Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.