भाजपाच्या जाहिरातीतून दोघा आमदारांचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 10:59 PM2018-10-18T22:59:33+5:302018-10-19T00:11:50+5:30

काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतिगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून शहरातील दोघा आमदारांचे छायाचित्र व नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने या संदर्भातील चर्चा अधिकच गडदपणे होऊ लागली आहे.

BJP's advertisement cut two MLA's address | भाजपाच्या जाहिरातीतून दोघा आमदारांचा पत्ता कट

भाजपाच्या जाहिरातीतून दोघा आमदारांचा पत्ता कट

Next
ठळक मुद्देपक्ष कार्यकर्ते संभ्रमात : प्रदेशच्या नेत्यांचा आशीर्वाद

नाशिक : काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतिगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून शहरातील दोघा आमदारांचे छायाचित्र व नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने या संदर्भातील चर्चा अधिकच गडदपणे होऊ लागली आहे. पक्ष श्रेष्ठींच्या आशीर्वादानेच विद्यमान आमदारांना जाहिरातीतून दूर ठेवण्यात आल्याचा अंदाज काढला जात आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधीपक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील भाजपातील दोघा आमदारांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या अहवालात आमदारांची नावे असली तरी, ती पक्षाने उघड केलेली नाहीत, मात्र त्याचा आधार घेऊन प्रत्येक आमदाराच्या कामकाजाकडेच संशयाने पाहिले जात आहे.
जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार असून, त्यातील राहुल अहेर हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. शहरात तीन आमदार असल्याने त्यातील दोन कोण? असा प्रश्न कार्यकर्ते पक्षांतर्गत विचारू लागले आहेत. शहरातील महापालिकेतील पदाधिकारी व पक्षाचे प्रदेश पदाधिकाºयांचे छायाचित्रासह नावे प्रसिद्ध केलेली असताना हिरे, फरांदे यांना त्यातून वगळण्याची बाब अनेक कार्यकर्त्यांना खटकली आहे. त्यामुळे त्यातून अनेक अर्थ काढले जात असून, ज्या दोन आमदारांच्या कामकाजा बाबत असमाधान व्यक्त केले जात आहे, त्यातील तर हे दोघे नसावेत? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे शहरातील दोघा आमदारांना जाहिरातीतून डावलण्याची कृती पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नसल्याची कार्यकर्त्यांना खात्री आहे. त्यामुळे या साºया प्रकाराला वरिष्ठांचा आशीर्वाद मानला जात आहे.
खुद्द तिघा आमदारांकडूनही याबाबतची चाचपणी केली जात असताना त्या पार्श्वभूमीवर नाशिक दौºयावर आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागताच्या जाहिरातीवरून आमदारांच्या कामकाजाबाबतची चर्चा अधिक ठळकपणे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीतून पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व मध्यच्या देवयानी फरांदे यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे अधोरेखित झाले.

Web Title: BJP's advertisement cut two MLA's address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.