दुधाच्या अनुदानवाढीसाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:43 PM2020-07-20T17:43:51+5:302020-07-20T17:44:33+5:30
जिल्हा व शहर भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतीलिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
नाशिक : जिल्हा व शहर भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट दहा रु पये प्रतीलिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणादेखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्या. तसेच जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसंग्राम पार्टीचे प्रदेश अध्यक्ष विनायक मेटे, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार भारती पवार, भाजपानाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, अध्यक्ष रासप उत्तर महाराष्ट्र राजेंद्र पाथोरे, जिल्हाध्यक्ष अरु ण आव्हाड, शहराध्यक्ष विलास पलंगे, जिल्हाध्यक्ष आरपीआय(ए) प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम अमित जाधव आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये १५० लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दूध खासगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते.
मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्र ीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध २० ते २२ रु पये दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही. शासनाने दहा लाख लिटर दूध २५ रु . प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केल्या जात असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्ष, शिवसंग्राम, रासप, आरपीआय, रयतक्र ांती व संलग्न पक्षाच्या निवेदनात केला आहे. सर्व शेतकरी बांधवांसह दि. १ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.