ओबीसी आरक्षणाप्रश्नी येवल्यात भाजपाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 10:48 PM2022-03-07T22:48:01+5:302022-03-07T22:51:19+5:30
येवला : ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन महिन्यात इम्पॅरिकल डाटा गोळा करावा किंवा सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने येथील तहसील कार्यालया बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन यावेळी सादर करण्यात आले. ७ ते १५ मार्चपर्यंत १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा यांची मुदत संपत आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. त्यावर सरकार काहीच करत नाही. निवडणुका झाल्यावर हे सरकार कायदा करतील. ओबीसींशिवाय निवडणुका घेण्यासाठी काही प्रमुख नेत्यांचा दबाव आहे. पुढील पाच वर्ष ओबीसींना एकही जागा मिळू नये म्हणून हे एक षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर राजूसिंग परदेशी, सुनील काटवे, केदारनाथ वेलणकर, बाबासाहेब डमाळे, तरंग गुजराथी, आनंद शिंदे, समीर समदरिया, मयूर मेघराज, सरचिटणीस बापू गाडेकर, गणेश पवार, संतोष काटे, ढमाले, सुनील बाबर, रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे, अनुपमा मडे, रत्ना गवळी, मनीषा कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : ०७ येवला बीजेपी आंदोलन
येवला तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पंकजा मगर यांना निवेदन देतांना भाजपा पदाधिकारी.