राष्टÑवादीच्या स्नेहभोजनास भाजपाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:09 AM2018-05-18T00:09:57+5:302018-05-18T00:09:57+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनी तातडीने धाव घेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच मतदारांशी संपर्क साधून व्यूहरचना केली. विशेष म्हणजे, पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित स्नेहभोजनास भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे राष्टÑवादी-भाजपाच्या छुप्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनी तातडीने धाव घेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच मतदारांशी संपर्क साधून व्यूहरचना केली. विशेष म्हणजे, पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित स्नेहभोजनास भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे राष्टÑवादी-भाजपाच्या छुप्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून मित्रपक्षांची मर्जी राखण्याबरोबरच विरोधी पक्षांच्या नाराज गटावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी स्वत: नाशकात मुक्काम ठोकून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी संवाद साधून राष्टÑवादीला मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे या निवडणुकीची राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्टÑवादी भवन येथे प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. पक्षांतर्गत राजी-नाराजी चाचपून घेण्याबरोबरच त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून मानसन्मान देण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी तसेच उमेदवार शिवाजी सहाणे यांना दिल्या. तसेच मालेगावचे आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. साधारणत: दीड तास ही बैठक चालली.
विधान परिषदेची निवडणूक ऐन रंगात आली असताना भाजपाच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीच्या तंबूत हजेरी लावल्याने भाजपा-राष्टÑवादीची छुपी युती झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्या भाजपा या निवडणुकीबाबत नेमकी काय अधिकृत भूमिका घेते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर सध्या राष्टÑवादीच्या वळचणीला असलेले भाजपाचे नाराज आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांसाठी पंचवटीत भोजनाचे आयोजन केले होते. याठिकाणी विधान परिषद निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल व प्रतापदादा सोनवणे यांच्यासह भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी पाटील यांच्यासोबत स्नेहभोजन घेऊन चर्चा केली.