जिल्ह्यात भाजपचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:03 AM2020-08-30T00:03:19+5:302020-08-30T01:22:25+5:30
नाशिक : जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
मालेगाव तहसील कार्यालय आवारात आंदोलन करताना सुरेश निकम, सुनील शेलार, पप्पू पाटील, सुधीर जाधव, संजय काळे, सतीश उपाध्ये, सुरेश गवळी, योगेश पाथरे, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, अनिल वाघ आदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
लॉकडाऊननंतर राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. राज्यातील मॉल व इतर दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, जैन मंदिर आदी प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.
शासनाला याबाबत जाग यावी म्हणून घंटानाद करण्यात आला. भाजपच्या शिष्टमंडळाने स्थानिक प्रशासनास निवेदन देत भूमिका मांडली.मालेगावी तहसीलदारांना निवेदन मालेगाव : भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सुनील शेलार, पप्पू पाटील, सुधीर जाधव, संजय काळे, सतीश उपाध्ये, सुरेश गवळी, योगेश पाथरे, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, अनिल वाघ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.दिंडोरी परिसर
दिंडोरी : मंदिरं खुली करण्यासाठी भाजपतर्फे येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, चंद्रकांत राजे, नगरसेवक तुषार वाघमारे, योगेश तिडके, श्याम मुरकुटे,
मंगला शिंदे, तुषार घोरपडे, रघुनाथ जाधव, रावसाहेब कदम, काकासाहेब देशमुख, दत्तात्रय जाधव, भास्कर कराटे, नीलेश गायकवाड, साजन पगारे, अनिकेत जगताप, विनोद चव्हाण, मयूर चव्हाण, धीरज चव्हाण व भाविक उपस्थित होते.