मालेगावी भाजपचे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:35+5:302021-06-27T04:10:35+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिकासारख्या संख्यांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिकासारख्या संख्यांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्यामुळे आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगर प्रमुख मदन गायकवाड, नितीन पोफळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी चाळीसगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड, भाजपचे प्रभारी शशिकांत वाणी, दीपक पवार यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. या आंदोलनात नितीन पोफळे, दीपक देसले, राजेंद्र शेलार, दीपक गायकवाड, श्रीकांत शेवाळे, मुन्ना अहिरे, राकेश गायकवाड, युवा गीते, विवेक वारुळे, प्रशांत पवार, जयप्रकाश पठाडे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
-------------------------
जयकुमार रावल यांची शासनावर टीका
या आंदोलनाच्या दरम्यान राज्याचे माजी पर्यटनमंत्री, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार जयकुमार रावल आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनावर टीका केली. २०१९च्या निवडणुकीत गद्दारी करून महावसुली सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर समाजातील शेतकरी, मराठा, दलित, आदिवासी व इतर कुठल्याही समाजाला न्याय दिला नाही. राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. सध्याचे शासनातील विभाग राजे बनले असून, त्यांच्याकडे वसुलीसाठी वाजे आहेत. ओबीसी आरक्षण रद्द करून निवडणुका घेण्याचा डाव रचला जात आहे. या विरोधात यापुढे तीव्र लढा उभारला जाईल, असे रावल यांनी सांगितले.
----------------------
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
तालुक्यातील आघार बुद्रुक येथे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दादा जाधव, लकी गिल, जि.प. सदस्य समाधान हिरे, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, संघटन सरचिटणीस देवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
फोटो फाईल नेम : २६ एमजेयुएन ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मालेगाव येथील चाळीसगाव चाैफुलीवर झालेल्या रास्ता रोको प्रसंगी शासनावर टीका करताना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल. समवेत भाजपचे सुनील गायकवाड, दीपक पवार, मदन गायकवाड, नितीन पोफळे, शशिकांत वाणी व पदाधिकारी.
फोटो फाईल नेम : २६ एमजेयुएन ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : भाजपच्या चक्का जाम आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर वाहनांची लागलेली रांग.
फोटो फाईल नेम : २६ एमजेयुएन ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ मालेगाव-सटाणा रस्त्यावरील आघार बुद्रुक येथे चक्का जाम आंदोलन करताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दादा जाधव, लकी गिल, जि.प. सदस्य समाधान हिरे, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, संजय निकम आदींसह पदाधिकारी.
===Photopath===
260621\26nsk_1_26062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.