पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:32 PM2020-06-26T17:32:00+5:302020-06-26T17:32:19+5:30
कळवण : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
कळवण : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरीत अंमलबजावणी करावी व शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांकडून खरीप हंगामाकरीता पीककर्ज उपलब्ध करु न द्यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरीत अंमलबजावणी करु न शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांकडून खरिप हंगामाकरीता पीककर्ज उपलब्ध करु न द्यावे, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रु पयांचा हप्ता मिळावा. खरिप हंगामाकरीता बी बियाणे, रासायनिक खते,शेती औजारे खरेदी करण्यासाठी पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करु न द्यावे. राष्ट्रीयकृत बॅँक पिक कर्ज देण्याकरीता टाळाटाळ करीत आहेत, त्याबाबत दखल घ्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अन्यथा शेतकºयांसाठी आंदोलन छेडले असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस डॉ.अनिल महाजन, विश्वास पाटील ,शहराध्यक्ष निंबा पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे यांच्यासह काशिनाथ गुंजाळ, एस.के .पगार, हितेंद्र पगार काकाजी जाधव आदी उपस्थित होते.