शासननिर्णयाप्रमाणे कामे करण्याची भाजपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:46+5:302021-08-12T04:17:46+5:30
येवला : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन येवला : महावितरणने शासननिर्णयाप्रमाणे नवीन कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे ...
येवला : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन
येवला : महावितरणने शासननिर्णयाप्रमाणे नवीन कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे बळकटीकरण व इतर अनुषंगिक कामे करावीत, अशी मागणी भाजपच्यावतीने एका निवेदनाद्वारे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. शासननिर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. येवला कार्यालयाची एकूण वसुली रक्कम अंदाजे ५ कोटींच्या घरात असून सदर योजनेच्या ३३ टक्के रक्कम ही १.८ कोटींच्या घरात आहे. सदरची रक्कम शासननिर्णयाप्रमाणे कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे बळकटीकरण व इतर अनुषंगिक कामांना वापरणे अपेक्षित होते; परंतु महावितरण व संबंधित कामांचे ठेकेदार हे शेतकऱ्यांकडून रकमा वसूल करत असल्याने सदर बाब शेतकरी व ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. शासन शासननिर्णयाप्रमाणे कामे न झाल्यास भाजपच्यावतीने जनआंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, आनंद शिदे, नानासाहेब लहरे, संतोष काटे, महेशकुमार पाटील, बाळासाहेब शिंदे, सुधाकर पाटोळे, रोहित मढवई, किरण लभडे, चेतन धसे, नामदेव शिंदे, संजय जाधव, सुनील घिगे, शिवराम डोंगरे, सागर नाइकवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
फाेटो- ०९ येवला बीजेपी
येवला येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.
090821\565709nsk_49_09082021_13.jpg
फाेटो- ०९ येवला बीजेपी येवला येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांना निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी.