सरकारविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:41 PM2020-02-25T14:41:55+5:302020-02-25T14:42:06+5:30

इगतपुरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

 BJP's Dharna agitation against the government | सरकारविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

सरकारविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

Next

इगतपुरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेना सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असुन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेले प्रकल्प व योजना या सरकारने सर्वसामान्यांची फसवणुक केली आहे असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांनी केला. इगतपुरी तहसील कार्यालयावर भाजपाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी कडभाने बोलत होते.
यावेळी इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, माजी आमदार शिवराम झोले, माजी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब डोंगरे, ज्येष्ठ नेते पांडुरंग ब-हे, संपतराव काळे, माजी शहराध्यक्ष मुन्ना पवार, पं स सदस्य अण्णा पवार, महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली आडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी विविध मागण्या व निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांना देण्यात आले.

Web Title:  BJP's Dharna agitation against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक