सिडकोतील उड्डाणपुलाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:53+5:302021-06-04T04:12:53+5:30

त्र्यंबकरोडवर मायको सर्कल आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल साकारण्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांंचा खर्च येणार असून त्यासाठी महापालिकेने रितसर ...

BJP's double role regarding CIDCO flyover | सिडकोतील उड्डाणपुलाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका

सिडकोतील उड्डाणपुलाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका

Next

त्र्यंबकरोडवर मायको सर्कल आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल साकारण्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांंचा खर्च येणार असून त्यासाठी महापालिकेने रितसर मंजुरी दिली आहे. मात्र, नंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा कर्ज प्रस्ताव नाकारल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी या पुलाला विरोध केला आणि २७ एप्रिलला या पुलाचे तात्पुरत्या स्वरूपात काम रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने ११ मे राेजी सिडकोतील पुलाच्या कामासंदर्भात महापालिकेने वर्कऑर्डर संबंधित ठेकेदाराला दिली परंतु कोरोना निर्बंधामुळे थांबल्याचे सुधाकर बडगुजर यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पीय महासभेत यांसदर्भात बडगुजर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापौरांनी त्याचे समर्थनदेखील केले होते. त्यावर बडगुजर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

इन्फो

उड्डाणपुलासाठी एकाच वर्षात दीडशे कोटी रुपये द्यावे लागणार नाही, मात्र तरीही त्यास महापौरांनी विराेध केला आणि दुसरीकडे आयुक्तांनी भूसंपादनासाठी शंभर कोटी आणि सिंहस्थातील भूसंपादनासाठी तीस कोटी अशी १३० कोटी रुपयांची तरतूद केली. महासभेत वाढवून २१६ कोटी करण्यात आली प्रत्यक्षात तब्बल ३८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. म्हणजेच १६७ कोटी अतिरिक्त खर्च करण्यात आले. ही रक्कम नागरी कामांवर खर्च झाली नसती काय, असा प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: BJP's double role regarding CIDCO flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.